चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षकाने दिली तालिबानी शिक्षा , शाळेच्या पहिल्या मजल्यावरून उलटे लटकावले, मुख्याध्यापकांच्या विरोधात गुन्हा दाखल

शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (14:43 IST)
मिर्जापूर जनपद जिल्ह्यातील अहरोरा येथील एका खासगी शाळेत शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला अभ्यास न केल्याने तालिबानी शिक्षा  देण्याचे वृत्त मिळाले आहे.इयत्ता चौथीत असणाऱ्या या विद्यार्थ्याने अभ्यास केला नाही म्हणून मुख्याध्यापकाने शाळेच्या पहिल्या मजल्यावरून उलटे लटकावून दिले.
 
या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर या शाळेतील मुख्याध्यापकाची चांगलीच बदनामी होत आहे. तसेच या शाळेतील मुख्याध्यापकांवर पालकांची तीव्र संतप्त प्रतिक्रिया होत आहे. लोकांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, मुलाचा पाय निसटला असता की मोठा अनर्थ घडला असता. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधित मुख्याध्यापकांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. मनोज विश्वकर्मा असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मिर्झापूर जिल्ह्यातील अहरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डीह गावात असलेल्या सद्भावना नावाच्या एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापकांना असे वाटले की इयत्ता चवथी मध्ये शिकणाऱ्या या मुलाने शाळेचा अभ्यास केला नाही. या गोष्टीचा त्यांना राग आला आणि त्यांनी त्या चिमुकल्याला रागाच्या भरात येऊन घाबरवण्यासाठी शाळेच्या पहिल्या मजल्यावरून उलटे लटकवूंन दिले.
मुख्याध्यापकांच्या अशा शिक्षा देण्याच्या प्रकाराने शाळेतील इतर विद्यार्थी हादरून गेले आहे. त्यांना प्रचंड धक्का बसला आहे. 
 
शाळेतून या विद्यार्थ्यांचा फोटो व्हायरल होतातच विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत जाऊन गदारोळ केला. तसेच जिल्हा प्रशासनाने देखील यावर दखल घेतली. 
जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार बीएसएने बीईओ जमालपूर अरुण सिंग यांना आरोपी प्राचार्य मनोज विश्वकर्माविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात बीएसएने सांगितले की, बीईओ जमालपूर अरुण सिंग यांना आरोपी मुख्याध्यापकांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती