कटप्पाच्या मुलीचे थेट पंतप्रधानांना पत्र

गुरूवार, 20 जुलै 2017 (12:12 IST)
बाहुबली सिनेमात कटप्पाची भूमिका करणारे अभिनेते सत्यराज यांच्या मुलीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. सत्यराज यांनी मुलगी दिव्याने या पत्रात काही वैद्यकीय कंपन्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 

दिव्या स्वत: डॉक्टर आहे. काही यूएस फार्मा कंपन्या मला त्यांची औषधं रुग्णांना सूचवण्यासाठी दबाव टाकत होत्या. मात्र या औषधांमुळे रुग्णांच्या दृष्टीसह त्यांच्या जीवालाही धोका होऊ शकतो. त्यामुळे ही औषधं सूचवण्यास दिव्याने नकार दिला. मात्र दिव्या सत्यराजच्या नकारामुळे सदर कंपन्यांकडून तिला धमकीही देण्यात आली होती. पण धमक्यांना न घाबरता दिव्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून यासंबंधीची माहिती दिली.

वेबदुनिया वर वाचा