IRCTC: आपले कंफर्म ट्रेन तिकिट कोणाला कसे ट्रांसफर करायचे जाणून घ्या

बुधवार, 29 ऑगस्ट 2018 (17:13 IST)
भारतीय रेलवे ट्रेन प्रवाशांना आपले कन्फर्म तिकिट इतर व्यक्तीला ट्रांसफर करण्याची देखील सुविधा देतो. रेल्वे यात्री ट्रेन सुरू होण्याच्या किमान 24 तासाआधी आपले तिकिट कोणाला ट्रांसफर करू शकतात. रेल्वे वेबसाइट indianrailways.gov.in प्रमाणे एक रेल्वे यात्री आपले कन्फर्म ट्रेन तिकिट आपल्या परिवाराच्या एका सदस्याला जसे आई, वडील, भाऊ, बहीण, पुत्र, पुत्री, पती किंवा पत्नीच्या नावावर ट्रांसफर करू शकतो.   
 
भारतीय रेल्वेची टिकत ट्रांसफर सुविधेचा लाभ ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारच्या तिकिटांवर उचलू शकता. IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation irctc.co.in ) द्वारे बुक करण्यात आलेले ऑनलाईन तिकिटाच्या केसमध्ये यात्री ई-रिझर्वेशन स्लिपची प्रिंटेड कॉपीसोबत आपल्या जवळच्या रेल्वे रिझर्वेशन ऑफिसात जाऊन तिकिट ट्रांसफरचे आवेदन करू शकतो.   
 
येथे जाणून घ्या भारतीय रेल्वे टिकत ट्रांसफरशी निगडित काही मुख्य गोष्टी :
 
1. रेल्वे तिकिट ट्रांसफरचे आवेदन फक्त एकदा करू शकता.  
 
2. भारतीय रेल्वेच्या नियमाप्रमाणे या प्रकारचे आवेदन ग्रुपच्या एकूण सदस्यांच्या 10 टक्केपेक्षा जास्त नसतो.   
 
3. ड्यूटीवर यात्रा करत असलेल्या एखाद्या सरकारी कर्मचारीला देखील ट्रेन सुरू होण्याच्या 24 तासाअगोदर तिकिट ट्रांसफर केले जाऊ शकते.  
 
4. मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थानाच्या विद्यार्थीचे तिकिट इतर विद्यार्थीला ट्रांसफर केले जाऊ शकतात. पण यासाठी प्रिंसिपलला ट्रेन सुरू होण्याच्या किमान 48 तासाअगोदर आवेदन करणे गरजेचे आहे.   
 
5. मॅरिज पार्टीच्या केसमध्ये देखील एका सदस्याचे तिकिट दुसर्‍या सदस्याला ट्रांसफर केले जाऊ शकतात. यासाठी देखील ट्रेन सुरू होण्याच्या किमान 48 तासा अगोदर आवेदन करणे गरजेचे आहे.  
 
6. ट्रेन सुरू होण्याच्या किमान 48 तासा अगोदर एखाद्या एनसीसी कॅडेटचे तिकिट इतर एनसीसी कॅडेटला ट्रांसफर करू शकतो. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती