वैज्ञानिकांनी संशोधनात नवे 15 ग्रह शोधून काढले आहेत. यामधील तीन ग्रहांना सुपर अर्थ अशी नावे दिली आहेत. तसेच यातील एका ग्रहावर संशोधनात वैज्ञानिकांनी पाणी सापडलं आहे. या अगोदर झालेल्या संशोधनात देखील पाणी सापडलं आहे. तसेच मंगळ ग्रहावर देखील पाणी सापडलं आहे. हे ग्रह पृथ्वीपासून 200 प्रकाश वर्ष दूर स्थित असून पृथ्वीपेक्षा मोठे आहेत.
हा शोध जपानच्या टोक्यो इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वैज्ञानिकांनी केला आहे. यामध्ये त्यांनी जगातील सर्वात सुंदर आणि महत्वाच्या टेलीस्कोपची मदत घेतली आहे. यामध्ये अमेरिकेतील नासाच्या K2 ची आणि स्पेनच्या नॉरडिक ऑप्टिकल टेलीस्कोपची मदत घेतली आहे.