लालू यांना किडनी आणि डायबिटीज हे आजार आहेत. लालूयादव यांच्यावर वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये आणण्यात आले. लालूयादव यांच्यवर हृदय रोग तज्ज्ञ डॉ. पांड्या उपचार करणार आहेत. दरम्यान, नऊ वर्षांपूर्वी लालू यादव यांच्यावर बायपास सर्जरी त्यांनी केली होती. आता लालू यादव यांना किडनीवरील उपचारासाठी कर्नाटक राज्यातील बंगळुरु येणे नेण्यात येणार आहे. एम्स रुग्णालयाच्या रिर्पोटनुसार, लालूंची किडनी 60 टक्के निकामी झाल्या आहेत. तसेच लालूंना पाठ दुखीच्या देखील समस्या आहे, अशी माहिती आमदार भोला यादव यांनी दिली आहे.