मध्य प्रदेश मधील रीवा जिल्ह्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. एवढेच नाही तर तिच्यावर नराधमांनी लैंगिक अत्याचार करून तिला तीन लाख रुपयाला देखील विकले.
या मुलीचे अपहरण केल्यानंतर तिला राजस्थान मधील एका व्यक्तीला विकण्यात आले. यादरम्यान या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आले. पोलिसांनी या पीडित अल्पवयीन मुलीला राजस्थामधून रेस्क्यू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे व इतर आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलीस अधिकारींनी सांगितले.