करूणानिधींच्या वयोमानामुळे त्यांच्या शरीरातील सर्व अवयव योग्य पद्धतीने कार्यरत ठेवण्याचे वैद्यकीय पथकाला मोठे आव्हान आहे. त्यांच्यावर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवण्यात आले आहे. उपचारादरम्यान त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादावरच पुढील उपचाराची दिशा ठरेल, असे या मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे.
याचवर्षी ३ जून रोजी करूणानिधी यांनी आपला ९४ वा वाढदिवस साजरा केला. सुमारे ५० वर्षांपूर्वी त्यांनी २६ जुलै रोजी द्रमुकची धुरा आपल्या हातात घेतली होती. ते पाच वेळा मुख्यमंत्री आणि १२ वेळा विधानसभा सदस्य राहिले आहेत. आतापर्यंत त्यांनी ज्या-ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी विजय संपादन केला आहे.