अनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर प्रियांका अस्त्र अर्थात प्रियांका गांधी वढेरा यांना मैदानात उतरवणार आहे. आगामी २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत रायबरेलीतून सोनिया गांधींच्या ऐवजी प्रियांका गांधी उभ्या राहतील, अशी बातमी सूत्रांकडून उघड झाली आहे. या निर्णया मागे यामागे 2 कारणं आहेत. सोनिया गांधींची प्रकृती खराब असने आणि आणि दुसर कारण म्हणजे पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रियांकांनी निवडणुकीच्या राजकारणात पदार्पण कराव अशी मागणीच काँग्रेसमधल्या अनेकांनी केली आहे. भाजप 2019च्या निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशाकडे गंभीरपणे पाहत असून जोरदार तयारी केली आहे. त्यामुळेच काँग्रसनं आपली तयारी सुरू केली आहे. भाजपचं लक्ष अमेठी आणि रायबरेलीवर आहे. तो गड त्यांना काबीज करायचा आहे. आणि कॉंग्रेसला मोठा धक्का द्यायचा आहे. काँग्रेसच्या गोटात पुन्हा एकदा प्रियांका गांधी यांची मागणी होत आहे.
काँग्रेसचे नेते जगदीश शर्मा यांनी राहुल गांधी यांना प्रियांका गांधी यांच्यासोबत काम करायला हवे. जर असं झालं तर काँग्रेसला विजय मिळू शकतो अशी कबुलीच शर्मांनी दिली आहे. राहुल आणि प्रियांका या दोघांनी मिळून काम केले तर त्याचा फायदा काँग्रेसला होईल अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. आता कॉंग्रेस हा तरी निर्णय उपयोगी ठरणार आहे की नाही हे वेळचा ठरवणार आहे.