येथील धार्मिक स्थळं १ जूनपासून खुली होणार?

बुधवार, 27 मे 2020 (18:39 IST)
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. या दरम्यान सर्व धार्मिक स्थळेही बंद करण्यात आली होती. कारण लॉकडाउन म्हटल्यावर सर्वात आधी लोकं धार्मिक स्थळांवर गर्दी करतील अशी शंका होती. आता लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्या सुरु असून अनेक बाबींना शिथिलता दिली जात आहे अशात कर्नाटक सरकारनं धार्मिक स्थळ खुली करण्यासाठी पंतप्रधानांकडे परवानगी मागितली आहे. 
 
जर केंद्राकडून मंजूरी मिळाली तर कर्नाटकात १ जूनपासून धार्मिक स्थळ खुली होणार आहेत. मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं आहे. कर्नाटकातील मंदिर, मशीद, चर्च आणि इतर धार्मिक स्थळ खुली करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे. 
 
धार्मिक स्थळं खुली करण्यापूर्वी परवानग्या घ्याव्या लागणार असून जर केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली, तर १ जूनपासून धार्मिक स्थळे उघडू शकतील, असं मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सांगितलं.
 
देशात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाउनचा चौथा टप्पा संपायला आल्यावरही परिस्थिती अजून गंभीरच आहे त्यामुळे कर्नाटक सरकारची मागणी मान्य होईल याची शक्यता कमी असल्याचे वर्तविले जात आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती