कोरोनासोबत टोळ किटकांचे संकट

बुधवार, 27 मे 2020 (16:04 IST)
पाकिस्तानमार्गे टोळ किटकांची झुंड भारतात दाखल झाली आहे. हे टोळ किटक पिकांचे नुकसान करत आहेत. राजस्थानातील १८ आणि मध्य प्रदेशातील जवळपास १२ जिल्ह्यांतील पिकांचे नुकसान करून ते उत्तर प्रदेशांपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे या समस्यांना सामोर जाण्यासाठी पिकांवर कीटकनाशक फवारणी केली जात आहे. कोरोनाच्या या संकटात राजस्थान, पंजाब आणि गुजरात नंतर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा आणि छत्तीगडमधील शेतकरी तसेच सामान्य लोकांच्या टोळ कीटकांमुळे समस्या वाढल्या आहेत. टोळ कीटक हा एक नाकतोड्याचाच प्रकार आहे.
 
उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये प्रशासनाने देखरेख समिती नेमण्याबरोबरच टोळांच्या नाश करण्यासाठी कृषी सैन्य तयार केले आहे. ४५० ट्रॅक्टर माऊंटेड स्प्रेयर्स आणि रासायनिक उपकरणांनी सुसज्ज असणारी अ‍ॅग्री आर्मी रात्री टोळ कीटकांवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ करणार आहेत. जिल्हा कृषी अधिकारी डॉ सतीशचंद्र पाठक यांनी माहिती दिली की, टोळ कीटकांचा नाश करण्यासाठी ४५० ट्रॅक्टरच्या फवारण्या तयार केल्या आहेत. ४७०० लिटर किटकनाशकांचीही व्यवस्था केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती