कर्नाटक ५००च्या नोटा, कर्ज आणि व्हायरल सत्य बातमी

शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016 (10:04 IST)
अनेकांनी जुन्या खास करून ५०० आणि एक हजारच्या नोटा खपवण्यासाठी धावाधाव सुरु केली. अशाच की काय जुना नोटा संपवण्यासाठी कर्नाटकातील नेत्यांनी शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जवाटप केल्याची चर्चा जोरदार झाली होती. तर ही त्यांची बनवा बनवि सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणत व्हायरल झाली होती. मात्र घटनेमागील व्हायरल सत्य आता उजेडात आलं आहे. 
 
हजार-पाचशेच्या नोटा चलनातून रद्द करण्याबाबत घोषणा करण्यापूर्वीच (8 नोव्हेंबर) या नेत्यांनी गरिबांसाठी कर्ज मेळाव्याचं आयोजन केले होते. तर त्यामुळे जुन्या नोटा खपवण्यासाठी त्यांनी ही शक्कल लढवल्याच्या ‘व्हायरल’ बातमीत काहीच तथ्य नसल्याचं उघड झालं आहे. सोमवारी 7 तारखेला हे कर्जवाटप झालं असून 8 तारखेच्या पेपरात ही बातमी छापून आल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अनेक असे पुरावे समोर आले आहेत. मात्र तरीही अनेकांचा विश्वास आय्वर नाही, आधीच माहिती तर नव्हती ना या प्रकारच्या शंका अनेक उपस्थित करत आहेत. त्यामुळे हे कर्ज वाटप अनेक दिवस व्हायरल होत राहणार हे नक्की ! 

वेबदुनिया वर वाचा