मागील वेळेस ऑक्टोबर 2017 मध्ये एसटीएफने विकास दुबेला लखनौ येथून अटक केली होती. विकासने कानपूरमध्ये 2001 साली पोलीस ठाण्यात प्रवेश करून एका राज्यमंत्र्यांची हत्या केली होती. 2001 मध्ये विकास दुबे याने भाजप सरकारमधील राज्यमंत्री संतोष शुक्ला यांना पोलीस स्टेशनमध्ये घेरलं आणि गोळ्या घालून ठार केलं. या हायप्रोफाईल हत्येनंतर तो शिवलीच्या डॉन नावाने प्रसिद्ध झाला. त्याने कोर्टात आत्मसमर्पण केलं आणि काही महिन्यांनंतर जामिनावर बाहेर आला.
माहितीनुसार त्याला लहानपणापासून गुन्हेगारीमध्ये नाव मोठं करायचं स्वप्न होतं. त्याची गँग तयार करवून तो चोरी, दरोडे, खून असे गुन्हा करू लागला. नंतर त्याने राजकारणात येण्याचाही प्रयत्न केला. परंतू ते शक्य झाले नाही आणि त्याला अनेक वेळा अटक करण्यात आली.