अभिनय क्षेत्रात अपला ठसा उमटवल्यानंतर रजकीय पक्ष स्थापन करत नव्या कारकिर्दीला सुरुवात करणार्या कमल हसन यांनी वेळ आली तर आपण रजनीकांत यांच्यावर टीका करायला लाजणार नाही, असे म्हटले आहे. मात्र, ही टीका वैयक्तिक नसून, रजनीकांत यांच्या राजकीय पक्षाच्या योजना आणि तत्वांवर असेल असेही ते म्हणाले. हसन यांनी 'मक्कल निधी मध्यम' पक्षाची स्थापना करत राजकारणात प्रवेश केला आहे. राजनीकांतदेखील येणार्या दिवसांत आपल्या पक्षाची घोषणा करण्याच्या तयारीत आहेत.