स्मार्टफोनच्या व्यसनाचे कारण

स्मार्टफोन आज आपल्यसाठी कोणत्याही वस्तूपेक्षा जास्त गरजेचा बनला आहे. काहींना क्षणभरही त्यापासून दूर राहणे कठीण जाते. आपल्या जीवनातील त्याच्या वाढत्या शिरकावामुळे अनेकजण त्याच्या आधीन गेले आहेत. स्मार्टफोनच्या या व्यसनाबाबत जाणून घेण्यासाठी हल्लीच झालेल्या एका अध्ययनात असे दिसून आले की स्मार्टफोनच्या आधीन  होण्‍यामागे सामाजिक प्रवृत्ती हे कारण आहे. वेगाने विकसित होणार्‍या तंत्रज्ञानामुळे लोकांना सामाजिक संपर्काची सवय लागली आहे.
 
कॅनडातील मॅकगिल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या अध्ययनानुसार लोकांमधील स्मार्टफोनच्या व्यसनाचे कारण हायपर सोशल नाही, तर अँटी सोशल आहे. आतापर्यंत असे वाटत होते की बहुतांश लोक आपल्या मोबाइलवर मेसेज करतेवेळी वा नोटिफिकेशन तपासताना आपल्या जवळच्या लोकांपासून दूर होतात. अशा लोकांना आपण त्यांना समजापासून तुटलेले वा अँटीसोशल समजू लागतो. मात्र वास्तवात तसे नसते.
 
या अध्ययनानंतर शास्त्रज्ञांनी पालक व शिक्षकांना काही सल्ला दिला आहे. त्यांच्या मते इतरांच्या संपर्कात राहणे चांगली गोष्ट आहे. खरे महणजे मनुष्य सामाजिक प्राणी असून जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहवेसे वाटते. म्हणून तो सतत स्मार्टफोन इतरांचे प्रोफाइल व ते काय करतात, हे पाहत असतो, पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असायला हवी. आजची युवा पिढी पालकांना पाहूनही स्मार्टफोनचा जास्त वापर करण्यास प्रेरित होते. त्यामुळे पहिल्यांदा पालक व शिक्षकांनी ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती