JP Nadda appointed Leader of the House in Rajya Sabha : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची राज्यसभेतील सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नड्डा हे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची वरिष्ठ सभागृहात जागा घेतील. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत गोयल महाराष्ट्रातून विजयी झाले आहेत. गोयल यांनी आज कनिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली.
अधिकृत सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली. नड्डा हे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची वरिष्ठ सभागृहात जागा घेतील. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत गोयल महाराष्ट्रातून विजयी झाले आहेत. गोयल यांनी आज कनिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असण्यासोबतच नड्डा केंद्र सरकारमध्ये मंत्रीही आहेत. ते आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत आहेत. 18 व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या पहिल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांनी तसेच इतर नवनिर्वाचित सदस्यांनी सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली. कार्यवाहक सभापती (प्रोटेम स्पीकर) भर्त्रीहरी महताब यांनी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात केली आणि सदस्यांना शपथ दिली.
सिंग आणि कुलस्ते यांच्यासह काँग्रेस सदस्य के सुरेश, डीएमकेचे टीआर बालू आणि तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय यांचीही अध्यक्षांच्या पॅनेलमध्ये निवड करण्यात आली आहे, परंतु त्यांनी शपथ घेतली नाही. महताब यांच्या प्रोटेम स्पीकरच्या निवडीवर काँग्रेसने आक्षेप घेतला. नड्डा हे मूळचे हिमाचल प्रदेशचे, बिहारमध्ये जन्मलेले आणि सध्या गुजरातचे राज्यसभेचे सदस्य आहेत.