झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात शनिवारी रात्री एका बसचे नियंत्रण सुटल्याने ती नदीत कोसळल्याने चार जण ठार तर 24 जण जखमी झाले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गिरिडीह डुमरी रोडवर रात्री 8.40 च्या सुमारास रांचीहून गिरिडीहला जात असताना बस पुलावरून बाराकर नदीत पडून हा अपघात झाला.अपघातग्रस्त बस रांचीहून गिरिडीहला जात होती. बस गिरिडीह-डुमरी रस्त्यावर येताच अनियंत्रित बस पुलाचे रेलिंग तोडून 50 फूट खाली नदीत पडली बसमध्ये अनेक लोक अडकले असून अनेक प्रवासी नदीत बुडाले आहेत.
सध्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बसमध्ये किती प्रवासी होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गिरिडीहचे पोलीस अधीक्षक दीपक शर्मा म्हणाले की, ते घटनास्थळी आहेत आणि बचाव कार्यावर देखरेख करत आहेत. गिरिडीहचे सिव्हिल सर्जन डॉ. एसपी मिश्रा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, रुग्णालयात आणलेल्या चार जणांना मृत घोषित करण्यात आले, तर इतर 24जखमींवर उपचार सुरू आहेत.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे पथक बचाव कार्यात गुंतले आहे. सीएम सोरेन यांनी ट्विट केले की, रांचीहून गिरिडीहला जाणाऱ्या बसला गिरिडीहमधील बाराकर नदीत अपघात झाल्याची दुःखद बातमी मिळाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.