कर्नाटकमध्ये भाजपला पुन्हा एकदा मोठी चपराक मिळाली आहे. लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवणाऱ्या भाजपला काँग्रेस आणि जेडीयूच्या एकीने एक चांगला धडा शिकवला आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटकातील राजकीय घडामोडींबाबत केले आहे.साम दाम दंड भेद सर्व गोष्टींचा वापर करायचा आणि सत्ता मिळवायची हे अमित शाह आणि नरेंद्र मोदी या जोडीचं तंत्र भारताच्या लोकशाहीसाठी घातक आहे. लोकशाहीचे नियम पायदळी तुडवण्याचे काम ही जोडी आणि सत्ताधारी भाजप करत आहे. भाजपला फक्त सत्ता प्यारी आहे, सत्तेपलीकडे यांना काहीच दिसत नाही असे आता लोकच बोलू लागले आहेत, असेही ते म्हणाले.सामान्य माणूस आणि गोरगरिबांचे असंख्य प्रश्न आज प्रलंबित आहेत. पण पंतप्रधान मोदी यांना फक्त निवडणुका जिंकण्याचा छंद आहे. निवडणुकांसाठी देशातील अन्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठीही ते नेहमी तयार असतात. हे भाजपसाठी भविष्यात घातक आहे.