एअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक

शनिवार, 19 मे 2018 (15:12 IST)
एअरटेल आणि अमेझॉन इंडियाने मिळून ४ जी स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी दोन्ही कंपनीने करार केलाय. 'मेरा पहला स्मार्टफोन' प्रोग्रामनुसार ४ जी स्मार्टफोन खरेदीवर ग्राहकांना २,६०० रुपयांच कॅशबॅक मिळणार आहे. ही कॅशबॅक अमेझॉनवर उपलब्ध ६५ एक्सक्लूझईव ४ जी स्मार्टफोन खरेदीवर मिळणार आहे. सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ऑनर, एलजी, लिनोवो, मोटोरोला आणि इतर स्मार्टफोनच्या खरेदीवर उपलब्ध आहे. एअरटेल कडून ३६ महिन्यासाठी २ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल तर ६०० रुपयांचा कॅशबॅक एअरटेल रिचार्ज केल्यानंतर अमेझॉनतर्फे दिला जाणार आहे.
 
यासाठी अमेझॉन इंडियावरून एक्सक्लूझीव ४ जी स्मार्टफोन खरेदी करावा लागेल. पुर्ण डाऊनपेमेंट करावे लागले. ऑफर मिळणाऱ्या स्मार्टफोनची लिस्ट अमेझॉनने तयार केली आहे. कॅशबॅक मिळविण्यासाठी १८ महिन्यांमध्ये ३,५०० रुपयांचा एअरटेल रिचार्ज करावा लागेल. त्यानंतर ५०० रुपयांचा कॅशबॅक एअरटेलकडून मिळेल. पुढच्या १८ महिन्यात पुन्हा ३,५०० रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर १५०० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. अशाप्रकारे २००० रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.
 
तर ६०० रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक मिळविण्यासाठी अमेझॉनद्वारे १६९ रुपयांचा एअरटेल रिचार्ज करावा लागणार आहे. त्यानंतर ६०० रुपयांचा कॅशबॅक अमेझॉनकडून मिळणार आहे. सोबतच २४ महिन्यांपर्यंत २५ रुपयांच्या अमेझॉन बॅलेंन्स रुपात हा कॅशबॅक मिळणार आहे. एअरटेलच्या १६९ रुपयांच्या रिचार्जमध्ये यूजरला २८ दिवसांसाठी रोज अनलिमिटेड कॉलिंग आणि १ जीबी डेटा मिळणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती