क्रिकेटमधली नाणेफेक इतिहास जमा होणार

शुक्रवार, 18 मे 2018 (15:42 IST)

नेहमी क्रिकेटचा सामना सुरू होण्याआधी नाणेफेक जिंकणाऱ्या संघाच्या कर्णधाराने फलंदाजी घ्यायची की गोलंदाजी, हे ठरवायचे ही परंपरा सुरू आहे. मात्र, आगामी काळात नाणेफेक करण्याची ही पद्धत बंद होऊ शकते. यावर विचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीची २८-२९ मे रोजी मुंबईत बैठक होत आहे.

नाणेफेक कुणी जिंकली यावर अनेक मैदानांवर संबंधित सामन्याचा निकाल अवलंबून असायचा. विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये हा परिणाम अधिक जाणवत होता. मात्र, आगामी काळात ही नाणेफेक करण्याची पद्धत रद्द होऊन पाहुण्या संघाच्या कर्णधाराला फलंदाजी किंवा गोलंदाजी निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीची बैठक २८-२९ मे रोजी मुंबईत होत आहे. या बैठकीत क्रिकेटधील या सर्वात जुन्या परंपरेत बदल करण्याबाबत विचार होऊ शकतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती