जावेद अख्तर यांचे विधान ही बाष्कळ बडबड

सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (22:31 IST)
उर्दू साहित्यिक जावेद अख्तर यांनी काल एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना आरएसएस आणि बजरंग दल या संघटना तालिबानी मानसिकतेच्या असून, त्या भारताला हिंदुराष्ट्र म्हणून घोषित करण्याच्या मागे लागल्या आहेत, असा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे साहजिकच खळबळ उडाली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक संघटनांनी जावेद अख्तर यांना विरोध करायला सुरुवात केली आहे, काल त्यांच्या निवासस्थानासमोर संबंधित कार्यकर्त्यांनी निदर्शनेही केल्याची बातमी आहे. आता हे प्रकरण कसे वळण घेते ते बघायचे आहे.
 
आपल्या देशात स्वात्रंत्योत्तर काळात एक कथित पुरोगामी मंडळींचा वर्ग तयार झाला आहे, दिल्लीच्या वर्तुळात त्यांना ल्यूटियन्स म्हणून संबोधले जाते. सर्वधर्म समभावाचा पुरस्कार करत हिंदुत्वाला विरोध करायचा आणि हिंदुत्वाला विरोध करतांना मुस्लिम आणि ख्रिश्चनांची तळी उचलायची हेच काम हे ल्यूटियन्स करीत असतात. स्वात्रंत्योत्तर काळात पंडित नेहरूंनी विशेष प्रयत्न करून ही ल्यूटियन्स जमात विकसित केली आहे, त्यांच्यानंतर काँग्रेस आणि कम्युनिस्टांनी देखील या वर्गाला  विशेष हातभार लावला आहे. जावेद अख्तर हे या ल्यूटियन्स वर्गाचे प्रतिनिधी असल्यामुळे त्यांच्याकडून काही वेगळी अपेक्षा करता येत नाही.  
 
जावेद अख्तर यांचा पहिला आक्षेप आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ विचारांच्या तत्सम संघटना या ताबिबानी मानसिकतेच्या आहेत, तालिबान्यांना अफगाणमध्ये मुस्लिमांचे राज्य स्थापित करायचे आहे. तसेच या हिंदू तालिबान्यांनाही हिंदूंचे राष्ट्र स्थापित करायचे आहे. जावेद अख्तर हे गेली अनेक वर्ष हिंदुस्थानात हिंदूंसोबत वास्तव्य करीत आहेत. हिंदू संस्कृतीचा  परिचय त्यांना निश्चित आहेच. ज्या प्रमाणे मुस्लिम किंवा ख्रिश्चन हे धर्म विस्तारवादी आहेत, त्याप्रमाणे हिंदुधर्म हा कधीच विस्तारवादी नव्हता, हे जावेद अख्तर यांनी लक्षात घ्यायला हवे. भारताचा इतिहास बघितला तर पुराणकाळापासून इथे हिंदू गुण्यागोविंद्याने राहत होते, सुमारे सहाव्या किंवा सातव्या शतकात मुस्लिम आधी भारतात लुटालूट करण्यासाठी आले आणि नंतर त्यांनी इथेच राज्य करण्याचा निर्णय घेतला. इथे राज्य करीत असताना त्यांनी तलवारीच्या जोरावर बळजबरी करून अनेक हिंदूंना मुस्लिम धर्म स्वीकारायला भाग पाडले, इतिहास तपासल्यास जावेद अख्तर यांना याचे पुरावे निश्चित मिळतील. सुमारे १२व्या शतकात ख्रिश्चन भारतात आले ते व्यापारासाठी नंतर त्यांनीही भारत बळकावता कसा येईल हाच प्रयत्न केला, त्यासाठी त्यांनीही धर्मपरिवर्तनाच्या कार्यक्रम हाती घेतला, मात्र ख्रिश्चनांनी मुसलमानांसारखे  तलवारीच्या जोरावर धर्मपरिवर्तन केले नाही, तर भारतातील गरिबी आणि मागासलेपणाचा फायदा घेत हिंदूंना लालूच दाखवून धर्मपरिवर्तन करायला भाग पडले, या धर्मपरिवर्तनचे पुरावेही इतिहासात सापडतात. या पार्श्वभूमीवर हिंदूंनी धर्मविस्तारासाठी फारसे प्रयत्न केल्याचे दिसत नाही,इतकेच काय, पण  बळजबरीने परधर्मात गेलेल्या हिंदूंना परत स्वधर्मात यायचे असेल तरी त्यांना बऱ्याच अडचणी येत होत्या, एकूणच ज्याप्रमाणे मुस्लिम बळजबरी करून तलवारीच्या धाकावर धर्मपरिवर्तन करीत होते, तसे धर्मपरिवर्तन त्या काळातही हिंदूंनी केले नाही आज तर तसे कधीच होत नाही. संघ आणि बजरंग दल  यांनीही कधीच धाकदपातशा करून आणि लालूच दाखवून कुणाला हिंदू धर्मात आणण्याचा प्रयत्न केला नाही, मात्र हिंदूंवर कुणी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर ही मंडळी मदतीला निश्चित धावून जातात. जगातील हिंदूंचे सदनघठन व्हावे आणि सर्व हिंदू एकत्र येऊन एक ताकद उभी व्हावी ही संघाची भावना जरूर आहे, मात्र त्यासाठी संघाला दमबाजी मान्य नाही. तालिबानी ज्या पद्धतीने बंदुकीच्या जोरावर अफगाणिस्तानला मुस्लिम बनवू पाहत आहेत, तश्या प्रकारे संघ आणि बजरंग दलाने केले आहे याचे पुरावे कुठेही  उपलब्ध नाहीत. या पार्श्वभूमीवर सदनघा आणि बजरंग दलाला  तालिबानी म्हणणे कितपत योग्य आहे? याचा विचार जावेद अख्तर समर्थकांनी करायला हवा.
 
बजरंग दल आणि संघ हे भारताला हिंदुराष्ट्र बनवण्याच्या प्रयत्नात आहेत, असा आरोप जावेद अख्तर यांनी केला आहे. आज भारताची लोकसंख्या १३५ कोटी आहे, त्यातील जवळजवळ ९० कोटी नागरिक हे हिंदूं आहेत. त्यामुळे या देशात हिंदू बहुमतात आहेत, अश्या परिस्थितीत भारताला हिंदुराष्ट्र म्ह्णाणून घोषित केले त्यात वावगे काय? आज जगभरात ५० च्या वर देश मुस्लिम आहेत. तितकेच किंबहुन त्यापेक्षा जास्त देश ख्रिश्चन आहेत, माझ्या माहितीप्रमाणे भारत हाच एकमेव देश असा अणे, की तो निधार्मिक देश म्हणून ओळखला जातो, जगभरात १४० कोते हिंदू पसरलेले आहेत. मग या हिंदूंसाठी त्यांचा एकही देश नसावा हे किपत योग्य आहे, अश्यावेळी जिथे हिंदू बहुसंख्येने आहेत,तिथे त्या देशाला हिंदुराष्ट्र बनवण्याचा प्रयत्न केला, तर आक्षेप का असावा?
या लेखात आधी नमूद केल्याप्रमाणे सहाव्या सातव्या शतकापर्यंत भारतात सर्व हिंदूच वास्तव्याला होते. मुस्लिमांनी आक्रमण केल्यावर इथे बळजबरीने हिंदूंना मुस्लिम केले. त्यामुळे भारतात मुस्लिमांची संख्या वाढत राहिली, तोच प्रकार ख्रिश्चनांच्या बाबतीतही राहिला, मात्र खोलात जाऊन शोध केल्यास भारतातील बहुसंख्य मुस्लिम किंवा ख्रिश्चन हे मूळचे हिंदूच आहेत असे लक्षात येते. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताला हिंदुराष्ट्र म्हणून घोषित करायला काहीच हरकत नव्हती.
 
मात्र दुर्दैवाने तसे घडले नाही, याला कारण तत्कालीन राज्यकर्ते इंग्रजांची राजनीती हेच म्हणावे लागेल. इंग्रजांनी भारतात सत्ता मिळवली तेव्हा हिंदू आणि मुसलमान अश्या दोन धर्मांचे इथे वर्चस्व होते या दोघांमध्ये भांडणे लावून राज्य करणे हे इंग्रजांना सोयीचे होते, तेच त्यांनी केले. ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य देण्याची वेळ आली तेव्हाही त्यांनी हिंदू आणि मुसलमानांमध्ये  भांडणे लावणे पसंत केले, त्याचे पर्यवसान हिंदुस्तानचे दोन तुकडे होण्यात झाले हिंदूंकर्ता भारत आणि मुसलमानांकरिता  पाकिस्तान असे दोन देश बनले. मुसलमानांनी पाकिस्तानला मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित केले मात्र  भारताच्या तत्कालीन राज्यकर्त्यांनी  भारताला निधार्मिक राष्ट्र घोषित करण्यात धन्यता मानली.  त्यातही मतांसाठी मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे लांगूलचालन  आणि हिंदूंवर अन्याय हेच धोरण गेली अनेक वर्ष राबवले गेले.
 
 कपँग्रेसच्या या धोरणाला संघ परिवाराचा कायम विरोध होता. त्यामुळे काँग्रेसने अश्या कथित बुद्धिजीवी पुरोगामी  ल्यूटियन्सच्या माध्यमातून  संघ परिवाराला विरोध करण्यातच धन्यता मानली, आजही तेच चालू आहे. त्यामुळेच  जावेद अख्तर सारखे ल्यूटियन्स  असे खुलेआम आरोप करण्याची  हिम्मत करीत आहेत. जर भारत हे हिंदुराष्ट्र म्हणून घोषित केले गेले तर काँग्रेस आणि  कम्युनिस्टांना कुणीही विचारणार नाही, ही त्यांच्या मनात भीती आहे त्यातूनच हे आरोप होत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
 
अश्या परिस्थितीत भारताला हिंदुराष्ट्र घोषित करण्यात काहीही गैर नाही नव्हे ती आजची गरज आहे हे आपण सर्वानाच पटवून देणे  ही आजची खरी गरज आहे. भारत हा हिंदुराष्ट्र बाळही तरी इथे तालिबानी दहशतवादी संस्कृती नांदणार नाही तर  हिंदू धर्मातील तत्वानुसार सर्वसमावेशक वृत्ती असेल, हेदेखील सर्वांना पटवून द्यावे लागेल. हिंदुराष्ट्र होणे हे किती गरजेचे आहे, हे समजावून देत त्या दृष्टीने वाटचाल कशी करता येईल हेही बघावे लागेल. जर असे झाले तर जगभरातील हिंदूंसाठी  भारत हे आश्रयस्थान बानू शकेल आणि त्याचबरोबर भारत हा जागतिक महासत्ताही बानू शकेल, इतकेच या निमित्ताने सांगावेसे वाटते.  हे सर्व मुद्दे लक्षात घेता जावेद अख्तर यांची ही कोल्हेकुई म्हणजे निरर्थक आणि बाष्कळ बडबड  आहे हे सर्वांना समजावून द्यावे लागेल हे नक्की.
 
तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो....
 
ता.क. :  घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.
 
 अविनाश पाठक. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती