महबूबा यांचे मोठे विधान, म्हटले - PM मोदीच काश्मीरचा निकाल काढू शकतात

शनिवार, 6 मे 2017 (17:22 IST)
जम्मू-काश्मीरची मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे की आम्हाला दलादलामधून कोणी बाहेर काढू शकतात तर ते आहे फक्त पीएम मोदी. तेच काश्मीरचा निकाल लावू शकतात. ते जो निर्णय घेतील देश त्यांचा स्पोर्ट करेल. त्यांचे म्हणणे आहे की आधीचे पंतप्रधान यांना देखील पाकिस्तान जायचे होते पण त्यांनी जुर्रत केली नाही. पण पीएम मोदी लाहोर गेले. घाटीतील परिस्थिती बघून जम्मू आणि काश्मीरची मुख्यमंत्री महबूबा यांचे हे विधान समोर आले आहे. त्यांनी म्हटले की जर काश्मीरची स्थिती जास्त बिघडते तर जम्मू आणि लडाखवर त्याचा प्रभाव पडेल.  
 
महिलांच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी म्हटले की काश्मीरची समस्या 70 वर्ष जुनी आहे. सीएम मुफ्ती यांनी म्हटले की माझे वडील  मुफ्ती मोहम्मद सईद आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी काश्मीरमध्ये शांती प्रक्रियेची सुरुवात केली होती. आता त्यांचे वडील या जगात नाही आहे आणि  वाजपेयी सरकारही नाही आहे. त्यांनी म्हटले की यूपीए सरकार विचार करत होती की काश्मीरचे हालत सुधारत आहे पण आता तर ते अधिकच वाईट झाले आहे. कोणालाही कायदा आपल्या हातात घेण्याची परवानगी देण्यात येत नाही.  

वेबदुनिया वर वाचा