पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद

मंगळवार, 10 एप्रिल 2018 (13:40 IST)
एकदा परत मंगळवारी पाकिस्तानकडून सीमेवर पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याजवळील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत.
 
सुंदरबनी सेक्टरजवळील भारतीय चौक्यांना पाकिस्तानी सैन्याने टार्गेट केले होते. मंगळवारी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या या कारवाईला भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर दिले आहे.
 
या गोळीबारात विनोद सिंह आणि जाकी शर्मा हे दोन भारतीय जवान गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विनोद सिंह जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर जिल्ह्यातील खेती दानापूर येथील रहिवासी होते. तर रायफलमॅन असलेले जाकी शर्मा हे जम्मूच्या संहैल गावचे रहिवासी होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती