चेन्नई- तामिळनाडूचा पारंपरिक खेळ जल्लीकट्टूवर बंदीच्या विरोधात प्रदर्शन उग्र रूप धारण करत आहे. सुमारे 4000 हून अधिक प्रदर्शनकारी चेन्नईच्या मरीना बीचवर विरोध दर्शवत आहे. या प्रदर्शनात विद्यार्थी, आयटी कंपन्यांचे कर्मचारीदेखील सामील आहे. अनेक सिनेसृष्टीत कलाकारदेखील विरोधात समोर आले आहे.
मदुराई, चेन्नई याशहरांव्यतिरिक्त कोईम्बतूर, तंजावूर, कुदडलोरे, दिन्डीगूल, पुडुकोट्टई, कन्याकुमारी, विरूद्धनगर, तिरूचिरापल्ली, रामनाथपुरम, नागापट्टिनम, तिरूवरूर, थेनी, तिरूनवेली, शिवगंगा आणि इतर जिल्ह्यांमध्येही तरूण आणि विद्यार्थीगण प्रदर्शन करत आहे.
काय आहे जल्लीकट्टू, कसे खेळतात? पहा व्हिडिओ
जलीकट्टू हा पोंगल या सणादरम्यान खेळण्यात येणारा तामिळनाडूचा पारंपरिक खेळ आहे. या खेळाला 2000 वर्षांची परंपरा आहे. जलीकट्टू अर्थात वळूंना वश करणे.
जली अर्थात नाणी आणि कट्टू अर्थात बांधलेली. या खेळात एक पिशवी वळूच्या शिंगांना बांधली जाते. यात पुरस्कार राशी असते. या दरम्यान वळूंना भडकवून त्यांना पळण्यास प्रवृत्त केले जाते. यात वळू पळतात आणि त्यांच्या मागे लोकं धावतात आणि त्यांच्या शिंगांना बांधलेली पिशवी काढून घेण्याचा प्रयत्न करतात. जिंकणार्याला मोठे बक्षीस मिळतं.