ISRO : चांद्रयान-3 नंतर इस्रोची कामगिरी, PSLV-C56 ची 7 परदेशी उपग्रहांसह उड्डाण

रविवार, 30 जुलै 2023 (11:09 IST)
ISRO : चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोने आज आणखी एक विक्रम केला आहे. इस्रोने सकाळी साडेसहा वाजता सिंगापूरचे 7 उपग्रह प्रक्षेपित केले.  भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या श्रीहरिकोटा केंद्रातून PSLV-C56 चे प्रक्षेपण करण्यात आले आहे. रॉकेटचे हे 58 वे उड्डाण आहे. लोकांमध्ये त्याच्या लाँचिंग बद्दल प्रचंड उत्साह आहे. 
 
ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. PSLV-C56 ने सर्व सात उपग्रह त्यांच्या कक्षेत अचूकपणे सोडले आहेत.  
 
 
PSLV-C56 ही भारतीय अंतराळ संस्थेची दोन आठवड्यांतील दुसरी मोठी मोहीम आहे. आज सकाळी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचे प्रक्षेपण करण्यात  आले. भारताने यापूर्वी 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून चंद्रावर चांद्रयान-3 मोहीम प्रक्षेपित केली होती. या प्रक्षेपणातील DS-SAR हा मुख्य उपग्रह आहे. जे सिंगापूरच्या DSTA आणि ST अभियांत्रिकी म्हणजेच सिंगापूरच्या संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेने पाठपाठवले आहे. एकदा हा उपग्रह तैनात झाल्यानंतर आणि काम करण्यास सुरुवात केल्यानंतर, ते सिंगापूर सरकारला नकाशे तयार करण्यास मदत करेल. म्हणजेच सॅटेलाइट फोटो काढणे सोपे होणार आहे.   
 
Edited by - Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती