केरळमध्ये इसिसच्या हल्ल्याचा इशारा

मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (12:11 IST)
केरळमध्ये घातपाती कारवाया घडवण्याचा इशारा इस्लामिक स्टेटशी संबंधित गटाकडून दिल्या जात आहेत. मात्र या धमक्‍यांमुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन केरळ पोलिसांनी केले आहे. सोशल मिडीयावर पसरलेल्या या धमक्‍यांबाबत केरळ पोलिस तपास करत असून तसे अधिकृत निवेदनही केरळ पोलिसांनी प्रसिद्धीस दिले आहे. पोलिस सतर्क असून नागरिकांनीही असे मेसेज पसरवून घबराट निर्माण करू नये, असे आवाहन केले आहे. नागरिकांनी अशा मेसेजपासून दूरच रहावे, असे केरळ पोलिस महासंचालक लोकेंद्र बेहरा यांनी म्हटले आहे.
 
सोशल मिडीयावर इस्लामिक स्टेटच्या नावे खूप धमक्‍यांचे मेसेज फिरत आहेत. अशा मेसेजचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. त्यांच्या सत्यतेविषयी पोलिसांकडेही चौकशी करण्यात येत आहे, असेही बेहरा यांनी म्हटले आहे. अशा धमकीच्या मेसेजच्या तपासादरम्यान पोलिस सार्वजनिक प्रशासनाला सर्वसाधारणपणे सावधगिरीचा इशारा देतात. त्याचप्रमाणे जनहिताशी संबंधित ठिकाणांवर लक्ष ठेवले जाते. त्याचप्रमाणे सतर्कता बाळगली जात आहे. मात्र हे नियमित देखरेखीचे काम आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती