शिवसेना सेक्युलर आहे का? 1992ला काय झालं विसरलात?- असदुद्दीन ओवैसींचा सवाल

बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (09:27 IST)
ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात प्रलंबित असतानाच आता MIM ने मुस्लिम आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत सोलापुरात पक्षाची बैठक झाली. त्यामध्ये हा मुद्दा मांडण्यात आला.
11 डिसेंबरला मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी वाचवण्यासाठी 'चलो मुंबई'ची हाक देण्यात आलेली आहे.
"MIM ला मत दिल्यास त्याचा फायदा सेना - भाजपला होईल असं राष्ट्रवादी आणि काँग्रेसने म्हटलं होतं. MIM हा भाजपची बी टीम असल्याचं म्हटलं होतं. पण सत्ता स्थापन करण्यासाठी हेच शिवसेना - राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले, त्यांनी मुसलमानांना धोका नसल्याचं म्हटलं.
शिवसेना सेक्युलर नाही. ते भाजपसारखेच जातीयवादी आहेत. पवार साहेब, सांगा शिवसेना सेक्युलर आहे का? राहुल गांधी, सांगा शिवसेना सेक्युलर आहे का? तुम्ही विसरलात का 1992ला काय झालं?" असा सवाल या सभेत असदुद्दीन ओवैसींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला केलाय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती