आयआरसीटीसीने ट्विट करत सांगितलं आहे की, युजर्सनी आपली वैयक्तिक माहिती, मोबाइल क्रमांक कोणासोबतही शेअर करु नये. भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसी फक्त अधिकृत लिंकवरच तुमची माहिती मागतं. याशिवाय रिफंड प्रक्रियेसाठीदेखील आयआरसीटीसी कधीच फोन करत नाही.
याशिवाय आयआरसीटीसीने सल्ला दिला आहे की, कोणत्याही प्रवाशाने कोणत्याही परिस्थितीत आपला अकाऊंट नंबर, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, एटीएम आणि सीव्हीव्ही कोणासोबतही शेअर करु नये. एखाद्याकडे ही माहिती असेल तर अत्यंत सहजपणे बँक खात्यात घुसखोरी केली जाऊ शकते. रेल्वेचं तिकीट रद्द केल्यानंतर रिफंड प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित असते. याशिवाय रिफंड झालेले पैसे आपोआप तुमच्या खात्यात जमा होतात. यासाठी रेल्वे कधीच तुमच्या बँकेची माहिती किंवा क्रेडिट कार्ड आणि सीव्हीव्ही क्रमांक मागत नाही. याशिवाय तिकीट रद्द करण्यासंबंधीची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणासोबतही शेअर करु नका असे सांगितले आहे.