पाकिस्तानाला प्रत्युत्तर, भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले सैन्याच्या चौका, दहशतवादी तळ

शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (21:50 IST)
करोनाचं संकट संपूर्ण जगात थैमान घालत असताना देखील पाकिस्तानाला कुरापती काढत आहे. पाकने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं आज भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय लष्कराला तोफांच्या अचूक मारा करत आणि गोळीने उत्तर देत पाक दहशतवादी तळ, मोठ्या प्रमाणातला शस्त्रसाठा उद्धवस्त करण्यात यश मिळाले आहे. 
 
भारतीय लष्कराने कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये कारवाई करत पाकला प्रत्युत्तर दिलं आहे.
 
जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरजवळ असलेल्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने शुक्रवारी सकाळी 11 वाजे पासून गोळीबार सुरु केला होता. या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती