लॉकडाउनशिवाय पर्याय नव्हता : उद्धव
कोरोना व्हायरसला पराभूत करण्यासाठी लॉकडाउनशिवाय दुसरा पर्याय नव्हता. वेळेबरोबर सगळ्या गोष्टी सुरळीत होतील असा आशावाद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. लोक कंटाळले आहेत हे मी समजू शकतो. पण कोरोनाला पराभूत करण्यासाठी घरी थांबणवाचून पर्याय नाही असे ठाकरे म्हणाले.