भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रमण्यम यांचा राजीनामा

बुधवार, 20 जून 2018 (17:07 IST)
भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.अमेरिकेत त्यांचे कुटुंब असून कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी आपण हा राजीनामा दिल्याचे सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे. याबाबत फेसबुक पोस्टमध्ये अरुण जेटलींनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी माझ्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. आपल्याला पुन्हा अमेरिकेत आपल्या घरी जाण्याची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले होते. यासाठी माझे कारण वैयक्तिक असले तरी ते माझ्यासाठी खुपच महत्वाचे आहे. काही कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा दबाव असल्याने आपल्याला हा निर्णय घ्यावा लागत आहे. सुब्रमण्यम यांनी कौटुंबिक कारण दिल्याने आपल्याकडे कुठलाही पर्याय नसल्याचे त्यांची अडचण लक्षात घेता मी देखील त्यांना परवानगी दिली. 
 
नियुक्तीच्या तीन वर्षांनंतर सुब्रमण्यम यांचा मुख्य आर्थिक सल्लागारपदाचा कार्यकाळ १६ ऑक्टोबर २०१७ रोजी संपला होता. त्यानंतर त्यांना गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत एक वर्षांसाठी त्यांची मुदत वाढवण्यात आली होती. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती