भारताचे चांद्रयान-२ येत्या १५ जुलैला झेपावणार

बुधवार, 12 जून 2019 (18:17 IST)
भारताची महत्वाकांक्षी मोहिम चांद्रयान-२ पुढील महिन्यांत १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी हे यान चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. भारतीय अंततराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली, तसेच या मोहिमेचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. तसेच या मोहिमेची माहिती देणाऱ्या एका वेबसाईटचे उद्घाटनही यावेळी डॉ. सिवन यांच्या हस्ते करण्यात आले. 
 
चांद्रयान-२ हे १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी प्रक्षेपित केले जाईल. याचे लँडर, रोव्हर आणि ऑर्बिटर असे तीन भाग असतील. रोव्हर हे एक रोबोटिक यंत्र असून त्याचे वजन २७ किलो असून लांबी १ मीटर आहे. लँडरचे वजन १.४ टन आणि लांबी  ३.५ मीटर आहे. तर ऑर्बिटरचे वजन २.४ टन आणि लांबी २.५ मीटर इतकी आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती