जागातील सहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत कॅनडा, चीन, मलेशियानंतर भारताचा क्रमांक लागतो. इप्सॉस मॉरी यांच्या सर्व्हेतून ही बाब समोर आली आहे.
भारतीय लोक विविध संस्कृती, दृष्टीकोनाच्या बाबतीत प्रत्येकाचं वेगळं मत असल्याने ते भारताला सहिष्णू देश मानतात. दुसरीकडे हंगरीमधील लोक त्यांच्या देशाला सर्वात कमी सहिष्णू देश मानतात. त्यानंतर दक्षिण कोरिया आणि ब्राझिलचा क्रमांक लागतो.