तर दंडात्मक कारवाई होणार

सोमवार, 15 जुलै 2019 (09:43 IST)
आधार क्रमांक चुकीचा दिल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात विवरणपत्र भरण्यासाठी आधार अथवा पॅन दोन्हीपैकी एकाची पूर्तता करण्याची अट घातली आहे. घर खरेदी, वाहन खरेदी, विदेश प्रवास, विवरणपत्र भरताना पॅन अथवा आधार अनिवार्य केले आहे. त्यामुळे आधारबाबत चुकीची माहिती दिल्यास संबंधिताला दहा हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
 
आधारची खातरजमा करण्याची जबाबदारी अधिकार्‍यांवरही सोपविण्यात आली आहे. आधारबाबत गैरप्रकार निदर्शनास आल्यास अधिकार्‍यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 1 सप्टेंबरपासून सुधारित नियमावलींची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशातील 120 कोटी लोकांकडे आधारकार्ड, तर 20 कोटी लोकांकडे पॅनकार्ड असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती