भारतीय सैन्याला दहशतवादी हल्ला रोखण्यात यश, पुलवामामध्ये IED जप्त

सोमवार, 31 मे 2021 (15:35 IST)
दक्षिण काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला (terror attack) रोखण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात स्फोटकं (IED) आढळून आली आहेत. भारतीय सैन्याच्या सतर्कतेमुळे मोठा दहशतवादी हल्ला होण्यापासून वाचला.
 
अवंतीपोरा येथील पंजगम भागाजवळच्या एका बागेत आयईडी सापडलं. स्फोटकं आढळून येताच भारतीय सैन्यानं Bomb Disposal Squadला पाचारण केलं. त्यानंतर स्फोटकं निकामी करण्यासाठी या ठिकाणी तात्काळ  दाखल झालं. काही वेळातच या पथकानं स्फोटकं निकामी केलीत.
 
Bomb Disposal Squad नं हे स्फोटक निकामी केलं आहे. एनआयए या वृत्तसंस्थेनं या संदर्भातलं वृत्त दिलं असून यासंबंधीचा व्हिडिओही ट्वीटरवर शेअर केला आहे.
 
दोन आठवड्यापूर्वीही दक्षिण पुलवामा जिल्ह्यात 10 किलोची स्फोटकं जप्त करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ट्वीटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी आयईडी हल्ले करण्याची प्रयत्नात आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती