'मुख्यमंत्री गप्प राहून किती महिलांवर बलात्कार होताना पाहणार आहेत?'-स्मृती इराणी

मंगळवार, 22 जून 2021 (18:15 IST)
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात वाद सुरू आहे.
 
"महिलांवर बलात्कार होत आहेत मात्र मुख्यमंत्री गप्प आहेत. मुख्यमंत्री गप्प राहून किती महिलांवर बलात्कार होताना पाहणार आहेत?" असा सवाल इराणी यांनी केला. तृणमूलला मत न दिल्याने हत्या केला जात असल्याचा आरोपदेखील इराणी यांनी केला. 
"देशात पहिल्यांदा निवडणुकीच्या निकालानंतर लोक आपली घरं, गावं सोडून जात आहेत. महिलांना घराबाहेर काढून बलात्कार होत आहेत," असं इराणी यांनी म्हटलं आहे.
 
"पश्चिम बंगालमध्ये कोरोना वाढीसाठी ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना दोषी ठरवत आहेत. त्यातून बॅनर्जी यांचे संस्कार दिसतात. मोदीजी त्यांचा उल्लेख दीदी असा करतात आणि त्या आमच्या नेत्यांसाठी सार्वजनिक व्यासपीठावरून अपशब्दांचा वापर करतात," असं देखील इराणी म्हणाल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती