सध्या सायबर हल्ल्यामुळे मोठे नुकसान होत आहे. सायबर हल्ल्याला रोखण्यासाठी केंद्र सरकार नवीन योजना आणत आहे. पुढील 5 वर्षांत सुमारे 5,000 उच्च प्रशिक्षित पोलीस अधिकारी किंवा सायबर कमांडोचे मोठे दल तयार केले जाईल, जे देशभरातील सायबर हल्ल्यांना तत्काळ प्रतिसाद देतील आणि त्यांना रोखतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी I4C च्या पहिल्या स्थापना दिनी ही घोषणा केली. ते म्हणाले की हे कमांडो आयटी इन्फ्रास्ट्रक्चर सुरक्षा, डिजिटल फॉरेन्सिक आणि घटना प्रतिसाद हाताळतील.असे ते म्हणाले.
गृहमंत्री अमित शहा हे भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र I4C च्या पहिल्या स्थापना दिनानिमित्त बोलताना म्हणाले, सायबर सुरक्षेचा राष्ट्रीय सुरक्षेचा एक भाग आहे.सायबर सुरक्षा सुनिश्चित केल्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही". "आमच्याकडे 5 वर्षांत 5,000 सायबर कमांडो असतील. हे कमांडो सायबर धोक्यांना वेगाने प्रतिसाद देतील.