अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची मागणीचा दावा फेटाळून लावला

बुधवार, 11 सप्टेंबर 2024 (16:35 IST)
महाराष्ट्रात लवकरात विधानसभा निवडणुका होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते त्यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट आणि बैठक घेतली.

या नंतर अजित पवारांनी अमित शहा यांच्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मागितले अशा बातम्या येत होत्या. अजित पवारांनी हा दावा फेटाळून लावला. तसेच भाजपने राज्यातील 25 विधानसभा जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव दिल्याचे अजितपवारांनी नाकारले. 

ते म्हणाले, मुख्यमंत्रीपदाची मागणी किंवा 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही,सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या भेटीत मी कापूस, सोयाबीन आणि कांदा उत्पादकांच्या समस्यांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालू नये, असे आवाहन मी केले आहे. कांद्याच्या विक्रीतून शेतकऱ्यांना जास्त भाव मिळत असेल तर तो मिळाला पाहिजे. यासोबतच एमएसपी वाढवण्याबाबतही चर्चा झाली आहे.
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती