Himachal Pradesh :हिमाचलमध्ये पावसाचे तांडव; 24 तासांत 8 जणांचा मृत्यू, रस्ते पूल वाहून गेले

सोमवार, 10 जुलै 2023 (23:45 IST)
हिमाचल प्रदेशात गेल्या 48 तासां पासून पावसाचा तांडव सुरु आहे. मनालीतील रोहतांग खिंडीतून उगम पावणाऱ्या बियास नदीने उग्र रूप धारण केले. बियास नदीने कुल्लू ते मंडी पर्यंत कहर माजवला आहे. गेल्या 24 तासांपासून पावसाचा उद्रेक झाला असून पावसामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर शिमलात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. 
हिमाचल प्रदेशाच्या मंडी, कुल्लू आणि लाहौल स्पिती या तीन जिल्ह्यात बियास आणि चंद्रभागा नद्यात पाच पूल वाहून गेले तर पाऊस आणि भुस्खनलामुळे 9 जण जखमी झाले तर 3 जण बेपत्ता झाले आहे.  

हिमाचल मधील सर्व शाळा आणि कॉलेज 10 आणि 11 जुलै रोजी बंद ठेवण्यात आले आहे. लाहौल स्पितीच्या चंद्रताल तलावाजवळ 200 हुन अधिक पर्यटक अडकले आहे. मंडी आणि कुल्लूमध्ये पावसामुळे विध्वंस झाला असून . मंडी जिल्ह्यात चार पूल वाहून गेले आहेत.  कुल्लू ते मनालीपर्यंत बियास नदीने मनाली-चंदीगड महामार्ग अनेक ठिकाणांहून वाहून गेला आहे. कुल्लूमध्येच एक व्होल्वो बस आणि एक ट्रक बियास नदीत वाहून गेला आहे. कसोल येथील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्या पार्वती नदीने वाहून नेल्या आहेत.

Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती