उत्तर प्रदेशातील अमेठीचे मो. आरिफ आणि सारसची मैत्री काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. अमेठीच्या जामो ब्लॉकमधील रहिवासी आरिफ आणि सारस यांची ऑगस्ट 2022 मध्ये मैत्री झाली. आरिफला सारस जखमी अवस्थेत आढळला होता. त्याच्या उजव्या पायाला झालेल्या जखमेतून रक्त वाहत होते. त्याच्या पायाला औषध लावून पट्टी बांधली गेली. त्यानंतर सारसला शेताच्या काठावर आडवे करण्यात आले. यानंतर तो सारसची काळजी घेत राहिला. सारस आरिफच्या घरी राहू लागला. हळूहळू दोघांची मैत्री अनुकरणीय होत गेली.
नंतर उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वादामुळे सारस पक्ष्याला वन विभागाने आरिफपासून दूर केलं होतं. सध्या हा सारस पक्षी कानपूर येथील प्राणी संग्रहालयात आहे. मात्र सरकारी परवानगी घेऊन तब्बल 27 दिवसांनी आरिफ यांनी सारसची भेट घेतली. क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर आरिफला सरांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून प्राणिसंग्रहालय प्रशासनाने आरिफला सारसला भेटण्याची परवानगी दिली. आरिफ मित्र सारससोबत 10 मिनिटे थांबला.