यापूर्वी नाशिकमध्ये झालेल्या धर्मशास्त्र सभेतही हनुमान जन्मस्थळाच्या वादाविषयी चर्चा करण्यात आली. किष्किंधा येथील मठाधिपती गोविंदानंद यांनी किष्किंधा हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा केला होता. त्याविरोधात महंत, पुजारी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यादरम्यान दोन्हीकडून हनुमान जन्मस्थळाचा दावा केला जात असतांना प्रमाण आणि दाखले दिले जात होते. यावेळी झालेल्या धर्मशास्त्र सभेत वैयक्तिक वाद निर्माण होउन साधुंच्या पदव्यांवरून खडाजंगी झाली होती. हा वाद शमतो न शमतो तोच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारात हनुमान जन्मस्थळ कर्नाटक असल्याचे वक्तव्य केल्याने नाशिकमधील साधू महंतांनी विरोध दर्शवला आहे.
योगी आदीत्यनाथ यांनी हनुमानाचा जन्म कर्नाटकात झाल्याचे वक्तव्य केले आहे. परंतू हनुमानाचा जन्म नाशिकच्या अंजेनेरी येथे झाला आहे. यासंदर्भात धर्मशास्त्र परिषदेत निर्णय देखील झाला आहे. पाठक गुरूजींनी याबाबत जो निर्णय दिला आहे त्याला सर्व संमती झाली असतांना पुन्हा असे वक्तव्य करून लोकांची दिशाभुल करणे योग्य नाही. : महंत सुधीरदास पुजारी