हमीद अन्सारी यांच्यावर सामनातून टीका

शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (11:31 IST)

देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे असं वक्तव्य करत आपला उपरराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपवणा-या हमीद अन्सारी यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून सडेतोड टीका केली आहे. एक दशक उपराष्ट्रपतीपद भोगल्यावर अन्सारी शेवटच्या दिवशी ‘जाता जाता’ हे सर्व बोलतात ही वेदना नसून सत्ता सुटल्याची व्यथा आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

गोरक्षणाच्या निमित्ताने मुसलमानांवर होणारे हल्ले जितके भयंकर तितकेच भयंकर ‘वंदे मातरम्’ म्हणण्यास नकार देणे आहे. ‘वंदे मातरम्’ म्हणण्यास नकार देणाऱयांपासून हिंदूंच्याही मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अशा राष्ट्रघातकी प्रवृत्तीपासून देशाला धोका आहे ही जनभावना आहे. खरे म्हणजे मुसलमानांनी त्यांच्या जबाबदारीचे भान ठेवले तर त्यांना या देशात कसलेच भय बाळगण्याचे कारण नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती