दुकाने, निवासी हॉटेल्स, उपहारगृहे, खाद्यगृहे, थिएटर्स, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या जागा व इतर अस्थापना यातील नोकरीच्या शर्तींचे आणि त्यात नोकरीवर ठेवलेल्या कर्मचा-यांच्या इतर सेवा शर्तींचे विनियमन करण्यासाठीचे हे विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले.
या अधिनियमानुसार दहापेक्षा कमी कर्मचारी काम करीत असणा-या प्रत्येक अस्थापनेचा मालकाला धंदा सुरू केल्याच्या 60 दिवसांच्या आत ऑनलाइन अर्ज करून स्वयं-घोषणापत्र, स्वयंप्रमाणित कागदपत्रे सादर करून नोंद करणे आवश्यक राहणार आहे. त्याचप्रमाणे दुकाने, व्यापारी संकुल किंवा मॉल उघडण्याच्याकिंवा बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्याचा अधिकार राज्य सरकारला राहणार आहे.