H5N1:कोरोनामध्ये आणखी एक धोका पसरला,देशात बर्ड फ्लूमुळे झाला पहिला मृत्यू

बुधवार, 21 जुलै 2021 (10:28 IST)
नवी दिल्ली. देशात कोरोना विषाणूच्या तिसर्‍या लाटेचा धोका अजूनही कायम आहे. केरळमध्ये झिका विषाणूच्या वाढलेल्या घटनांमुळे सरकारची चिंता वाढली आहे.दरम्यान,एम्स दिल्लीमध्ये दाखल झालेल्या 11 वर्षाच्या मुलाचा H5N1 बर्ड इन्फ्लूएन्झामुळे मृत्यू झाला आहे.
 
यावर्षी भारतात इन्फ्लूएन्झा विषाणूमुळे मृत्यूची पहिली घटना आहे. मीडिया रिपोर्टनुसार मुलाच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचार्‍यांना विलगीकरणात  ठेवण्यात आले आहे.
 
मुलाला 2 जुलैला एम्समध्ये दाखल केले होते. बर्ड फ्लू देखील H5N1 (बर्ड )एव्हीयन इन्फ्लूएन्झामुळे झाला. एव्हीयन(बर्ड) इन्फ्लूएन्झा (H5N1) विषाणू प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये आढळतो आणि अत्यंत संक्रामक आहे. HPAI Asian H5N1 विशेषतः कुक्कुटपालनासाठी प्राणघातक आहे.1996 मध्ये चीनमध्ये गीजमध्ये हे व्हायरस प्रथम सापडले होते.
 
एव्हीयन(बर्ड)फ्लूची लक्षणे ताप येणं,खोकला,अतिसार,श्वास घेण्यास त्रास होणे,डोके दुखी,स्नायूत वेदना, पोटदुखणे, न्यूमोनिया,डोळ्याचा संसर्ग अशी आहे.
 
मास्कचा सतत वापर करणे,हाताला वारंवार साबणाने धुणे,शिंकताना,खोकताना तोंडावर रुमाल ठेवणे, सेनेटाईझरचा वापर,पक्ष्यांच्या संपर्कात आल्यावर हाताला स्वच्छ धुणे,तसेच संक्रमित पोल्ट्री फॉर्म वर जाणे टाळणे.हे काही उपाय केल्यावर आपण या संसर्गापासून स्वतःला आणि इतरांना देखील वाचवू शकतो.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती