गुजरातमधील निकालाने मोदींच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न

मंगळवार, 19 डिसेंबर 2017 (15:41 IST)

गुजरातमधील निकालाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित केले असून क्रोध आणि द्वेषाचे राजकारण कामी येणार नाही, त्यावर प्रेमाने मात करता येते हा संदेशच मतदारांनी भाजपला दिल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. गुजरातमधील विकासाच्या मॉडलचे मार्केटिंग चांगले झाले होते, मात्र आतून हे मॉडल पोकळ होते. म्हणूनच संपूर्ण निवडणुकीत मोदी विकासावर बोलत नव्हते, असा आरोप त्यांनी केला. निकालांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राहुल गांधी यांनी संसदेबाहेर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 

यावेळी राहुल गांधी म्हणाले, तीन – चार महिन्यांपूर्वी मी गुजरातमध्ये गेलो त्यावेळी काँग्रेस भाजपशी लढू शकणार नाही असे सांगितले जात होते. पण त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले आणि निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केली. आमच्यासाठी हा निकाल चांगला होता. आमचा पराभव झाला, पण आम्ही जिंकू शकलो असतो. त्यात आम्ही थोडे कमी पडलो, असे त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती