सरकारी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या तोंडावर मिळणार पगारवाढ
रविवार, 3 ऑक्टोबर 2021 (10:51 IST)
सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारनं घरभाडं भत्ता आणि डीएमध्ये वाढ करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू केल्यानं, कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यामध्ये (HRA) 3 टक्के वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यानं HRA मध्येही वाढ करण्यात आली आहे.
डीए 25 टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास HRA मध्येदेखील वाढ केली जाणार असल्याचं जुलै महिन्यात सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आता घरभाडं भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला आहे.
या वाढीमुळं कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या शहरांच्या आणि त्यांच्या वेतनाच्या श्रेणीनुसार पगारामध्ये वाढ मिळणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पगारामध्ये ही वाढ करण्यात आली आहे.