केंद्र सरकार रेशन कार्डधारकांसाठी नवनवीन योजना आणत असते. जेणे करून रेशनकार्ड धारकांना त्याचा फायदा मिळावा. आता अंत्योदय रेशनकार्ड असणाऱ्या लोकांना सरकार ने त्यांच्या मोफत उपचारासाठी आयुष्यमान कार्ड बनव्यासाठी शासनाकडून जिल्हा व तहसील स्तरावरील सामुदायिक आरोग्य केंद्रांवर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत अंत्योदय कार्ड असलेल्या सर्व कुटुंबांची आयुष्मान कार्ड बनवण्याचे ध्येय आहे.या शिवाय शासनाने जनसुविधा केंद्रावर ही सुविधा सुरु करण्याचे आदेश दिले आहे. ज्यांच्या कडे आयुष्यमान कार्ड नाही त्या अंत्योदय कार्ड धारकांनी लवकरात लवकर २० जुलै पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी. अंत्योदय कार्ड धारकांना कोणतीही प्रकारची अडचण येऊ नये या साठी शासनाने ही सुविधा केली आहे. पात्र लाभार्थी सार्वजनिक सेवा केंद्र, सामुदायिक सेवा केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र, आयुष्यमान कार्ड राबविणारे संलग्न असलेले खासगी रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात जाऊन अंत्योदय शिधापत्रिका दाखवून कुटुंबियांचे आयुष्यमान कार्ड मिळवू शकतात. या योजनेत नवीन आयुष्यमान कार्ड बनवले जात नसून आधीची नावे यादीत असणाऱ्यांचे कार्ड बनवले जात आहे. या संदर्भात सर्व सूचना शासनाकडून विविध जिल्ह्यात आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात येत आहे.