रेल्वे मधून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे लवकरच ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकिटात दिली जाणारी सूट पुन्हा देऊ शकते. हीसूट कोरोना महामारीच्या दरम्यान बंद करण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिकांना स्लीपर आणि थर्ड एसी मध्ये सवलत देण्याचा आढावा घेऊन विचार करण्याचा सल्ला दिला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटावरील सवलत बहाल करावी, अशी शिफारस संसदीय समितीने केली आहे.रेल्वे बोर्डाने सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्याचा विचार आहे, अद्याप कोणत्याही अटी आणि शर्तींवर निर्णय घेतलेला नाही.
ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांना भाड्यात सरासरी 53 टक्के सूट मिळते. यासोबतच दिव्यांगजन, विद्यार्थी आणि रुग्णांना या सूटशिवाय अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात.स्लीपर आणि थर्ड एसीमध्ये प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात सवलत देण्याची मागणी संसदेशी संलग्न स्थायी समितीने केली आहे.