या प्रकारचे सोने नाही होणार जप्त!

गुरूवार, 1 डिसेंबर 2016 (17:06 IST)
नवी दिल्ली- वित्त मंत्रालयाने सोनं ठेवण्याची सीमा निश्चित करत घोषणा केली आहे की विवाहित स्त्रिया 500 ग्राम, अविवाहित स्त्रिया 250 ग्राम आणि पुरूष 100 ग्राम पर्यंत सोनं ठेवू शकतात.
सरकारने म्हटले की संशोधित आयकर कायद्यातंर्गत पैतृक दागिने आणि सोन्यावर टॅक्स लागणार नाही. याव्यतिरिक्त घोषित इन्कमने खरेदी केलेल्या सोन्यावरही टॅक्स लागणार नाही. सरकारने स्पष्ट केले की पैतृक 
संपत्ती म्हणून मिळालेल्या सोनं किंवा दागिन्यांवर कर लागणार नाही.

वेबदुनिया वर वाचा