गोल्डन बाबाचे खरे नाव सुधीरकुमार मक्कड असे आहे. तो मूळचा गाझियाबादचा आहे. संन्यासी बनण्यापूर्वी सुधीरकुमार मक्कड दिल्लीत गारमेंट्सचा व्यापार करत होता. आपल्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी तो काही काळापूर्वी बाबा बनला होता. गांधीनगरच्या अशोक गल्लीत गोल्डन बाबाचा एक आश्रम आहे. गोल्डन बाबाला सोने घालून सगळीकडे वावरण्याचा शौक होता. सोन्याला तो आपला इष्ट देवता मानत असे. बाबाच्या सुरक्षेसाठी नेहेमी त्याच्या अवतीभोवती २५- ३० सुरक्षा गार्ड तैनात असतं