प्रेयसीच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले, दररोज रात्री एक तुकडा बाहेर टाकायचा

सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (11:58 IST)
लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरुणाने प्रेयसीचा गळा आवळून तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. संपूर्ण मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो मध्यरात्री बाहेर जात असे. हत्येनंतर तब्बल सहा महिन्यांनी पोलिसांनी आरोपीला अटक केली. खरं तर, आपल्या 26 वर्षीय लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वॉकरची हत्या करून मृतदेह गहाळ केल्याचा आरोप असलेल्या आफताब अमीन पूनावालाला पोलिसांनी दिल्लीत अटक केली आहे.
 
पोलिसांनी आरोपी आफताबविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून श्रद्धाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार आफताबने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात फेकून दिले होते. 8 नोव्हेंबर रोजी 59 वर्षीय विकास मदन वॉकर यांनी आपल्या मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी दिल्लीच्या मेहरौली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता.
 
26 वर्षीय श्रद्धा वॉकर मुंबईतील एका मल्टीनॅशनल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती. तिथे असताना श्रद्धा आफताब अमीनला भेटली. दोघांची मैत्री झाली आणि मग पसंत पडले. त्यानंतर ते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागले. घरच्यांना जेव्हा या नात्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी विरोध केला. पण दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. विरोधानंतर श्रद्धा आणि आफताब मुंबई सोडून मेहरौलीच्या छतरपूर भागात राहू लागले. त्यानंतर कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, श्रद्धाचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले.
 
श्रद्धा वॉकरच्या वडिलांनी सांगितले की ते आपल्या कुटुंबासह महाराष्ट्रातील पालघर येथे राहतात. मुलगी भाड्याने राहत असलेल्या छतरपूर येथील श्रद्धाच्या फ्लॅटमध्ये 8 नोव्हेंबर रोजी पोहोचले असता फ्लॅटचा दरवाजा बंद दिसला. त्यानंतर त्यांनी मेहरौली पोलीस ठाणे गाठून पोलिसात एफआयआर दाखल केला. पोलिसांनी शनिवारी आफताबला अटक केली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने सांगितले की श्रद्धा अनेकदा लग्नासाठी दबाव टाकत होती. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. 18 मे रोजी भांडणात त्याने श्रद्धाचा गळा आवळून खून केला. यानंतर मृतदेहाचे अनेक तुकडे करून दिल्लीतील विविध भागात फेकून दिले. 18 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे फेकत राहिल्याची कबुलीही त्याने दिली आहे. मृतदेह ठेवण्यासाठी त्यांनी मोठा फ्रीज ठेवला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती